10-08-2020 - 16-08-2020

रोटरी क्लब ऑफ पुणे प्राधिकरण प्रोजेक्ट: डिजिटल गुरुमंत्र प्रिय शिक्षक बंधू-भगिनींनो, सस्नेह नमस्कार. डिस्ट्रिक्ट ३१३१ - रोटरी लिटरेसी टीम तर्फ़े सुरु होत असणाऱ्या “डिजिटल गुरूमंत्रा" या IT SKILLS FOR SMART TEACHING या उपक्रमात आपले मनःपूर्वक स्वागत. 🙏💐🙏💐🙏 आम्हाला नक्की खात्री आहे की, हे स्किल्स नक्कीच तुम्हाला तंत्रस्नेही बनण्यासाठी उपयुक्त ठरतील. या साठी आपल्याला ख़ाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन या उपक्रमात सहभागी होता येईल. हे प्रशिक्षण आपल्यासाठी निःशुल्क आहे. तसेच हे प्रशिक्षण घरच्या घरी तुमच्या सवडीप्रमाणे व्हॉटसअप च्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीने तुम्ही पूर्ण करू शकता. आपणा शिक्षकांचा प्रतिसाद म्हणजे कोविडच्या अभूतपूर्व परिस्थितीतही तुमची शिक्षणाप्रती, विद्यार्थ्यांप्रती असणारी तळमळ आणि आस्था याचे प्रतिक आहे असे रोटरीला वाटते. कालानुरूप बदल घडवून आणण्याच्या एका आनंददायी प्रक्रियेत आपण सामिल होत आहात ही अत्यंत समाधानाची बाब आहे. या उपक्रमात सलग पाच दिवस रोज तीन IT स्किल्सचे व्हिडिओ आणि त्यावरील प्रश्न व्हॉटसअप च्या माध्यमाद्वारे पाठवले जातील. हे व्हिडिओज तुमच्या सवडीने दिवसभरात कधीही पाहून तुम्ही ते स्किल आत्मसात करू शकता. थोडी प्रॅक्टीस पण करावी लागेल. कृपया यामधील सर्व स्किल्स स्वतः पुन्हा करून पहा. सहाव्या दिवशी आपण पुन्हा सर्व स्क़िल्ल्स ची प्रॅक्टीस करून उजळणी करा. सातव्या दिवशी आपण ऑनलाइन टेस्ट द्यावी. या टेस्ट मध्ये आपण ज़र ४०% पेक्षा अधिक गुण प्राप्त करू शकलात तर रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे आपणास कोर्स कंपलीशन चे सर्टिफ़िकेट दिले जाईल. ते आपल्या ई मेल वर पाठवले जाईल. खाली दिलेल्या गुगल फॉर्मच्या रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करा आणि रजिस्टर करून सबमिट करा Link: https://rebrand.ly/Digital-Mantra-Training-Registration-Form खाली दिलेल्या कोणत्याही एका लिंकवर क्लिक करून व्हॉटसअप ग्रूप मध्ये जॉईन करा. Link1: https://rebrand.ly/RCP-Pradhikaran-Training-GRP1 Link2: https://rebrand.ly/RCP-Pradhikaran-Training-GRP2 चला तर सहभागी होऊ या एका Smart Teacher होण्याच्या प्रवासाला. सर्वांना खूप खूप शुभेच्छा🙏 Happy Learning

Project Details

Start Date 10-08-2020
End Date 16-08-2020
Project Cost 15000
Rotary Volunteer Hours 6
No of direct Beneficiaries 362
Partner Clubs Rotary Dist 3131 Literacy team
Non Rotary Partners
Project Category District Thrust Area